STORYMIRROR

rutuja dhore

Others

3  

rutuja dhore

Others

‘मैत्री’

‘मैत्री’

1 min
165

जगातील सर्वांत सुंदर नात्याला मैत्री असे नाव,

अहंकार नाही, द्वेष नाही, फक्त प्रेमाचा वर्षाव


संकटसमयी साथ देऊन नेहमीच दिलास आधार,

विस्कटलेल्या आयुष्याने घेतला सुंदर आकार


राग-लोभ, रुसवे-फुगवे आपल्यातही झाले,

त्यामुळेच नाते आपुले अजून घट्ट झाले


तुझा विश्वास, तुझी साथ अशीच सदा राहू दे,

मैत्रीच्या ह्या फुलाला आणखी थोडं फुलू दे


रक्ताच्या नात्यापलीकडचे हे नाते,

टिकून राहावे जन्मोजन्मी सदैव मनी मज वाटे


Rate this content
Log in

More marathi poem from rutuja dhore