मैत्री....
मैत्री....
1 min
217
निखळ आनंदाची खाणं
वात्सल्याचे असे भावबंध
प्रेमस्वरूप मैत्री भाव
मांगल्याचे असे ऋणानुबंध
निर्मोह, प्रेम, त्यागाचे
दरवळे साश्वत सुगंध
मिळावी उत्स्फूर्त प्रेरणा
अभय असावा प्रेमबंध
अनुभूती असावी अस्तित्वाची
नसावा गर्व, अहंकार, गंड
मनाला मोहूनी टाकी
मैत्री पावित्र्याचे संबंध.