मैत्री की प्रेम
मैत्री की प्रेम
1 min
459
मी माझ्या मैत्रीणीच्या
मैत्रीत फार रमलो होतो..
मला जिकडे तिकडे तिचाच भास होतो
पण नकळत मी तिच्या प्रेमात पडत होतो.......
सांगू कसे? म्हणू कसे?
स्वतःच स्वतःला घाबरवत होतो,
ह्या पवित्र मैत्रीच्या नात्याला,
प्रेमाचा डाग लावत होतो....
प्रेमाच्या भावनानमुळे मी
मैत्री कुठेतरी विसरत होतो,
चुंबकापेक्षा घट्ट असलेला
विश्वास मी तोडत होतो....
मैत्रीत करून विचार प्रेमाचा
आनंद मैत्रीचा मी घालवत होतो,
प्रेमाला दूर करून मैत्रीत
फक्त दुःख मी सहन करीत होतो........
तिच्यावर प्रेम करून
मी मैत्रीला डाग लावणार होतो,
पण करूनी `मैत्रीवर´ प्रेम
मी माझी फक्त `मैत्री´जपत होतो.
