माय मराठी
माय मराठी
1 min
374
मराठीचे आम्ही शिलेदार
प्रेमाने आम्ही दिलदार
दाखवू जगाला ही मराठी
गर्जवू साता समुद्रापार
इथे नसे कधीच गर्व
पाहून घ्यारे ते सारे पर्व
प्रेमाने राहतात इथे लोक
एका ताटात जेवतात सर्व
वाटे ना कधी अपमान
बोलतो आम्ही थाटात
मराठी आमची भाषा
चालते पाय आता घाटात
मराठीचे करू गुणगाण
करू जीवाचे सारे रान
उंचावेल मग बघ मान
आहे मराठी आपली शान
