मावळत्या सूर्या जागा हो
मावळत्या सूर्या जागा हो
1 min
392
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
मनाला देवाशी जोडणारा धागा हो
वाईट विचारांना मोडणारा दादा हो
उद्याच्या सत्कर्माना घेणारा वादा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
विचारांना ज्ञानाशी जोडणारा धागा हो
आळसाला कापणाऱ्या यत्न्नांचा दादा हो
प्रयत्नांना यश देणारा वादा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
विवेकाला वैराग्याशी जोडणारा धागा हो
अंधारात चुकलेल्या मुलीचा दादा हो
तिला सुखरूप घरी पोहोचवणारा वादा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
लोकांच्या सुखांना जोडणारा धागा हो
मृत्यूनंतर स्मरणात राहणार दादा हो
पुढच्या जन्मीसुद्धा याच कर्माचा वादा हो
माझ्यातल्या मावळत्या सूर्या जागा हो
