मानव झाला यंत्र
मानव झाला यंत्र
ऑफिसच्या वेळेमध्ये कधी बांधलो गेलो कळलेच नाही,
Professional Life आणि Personal life यातला समतोल साधणं सर्वांच्या बसचं नाही
कामाच्या व्यापात आपण विसरून जातो स्वतःला,
अहो ! चाळीशी नंतर कोणकोणते रोग पाठी लागतात निदान हे तरी तपासा
तासन्तास एकाच खुर्चीवर बसून वाढतो पोटाचा घेर,
मात्र Deadlines ,Production ,Deployment हाच आवाज येतो चौफेर
कंबरदुखी, पाठदुखी, लठ्ठपणा असे कितीतरी आजार सतत देत असतात alarm,
आम्ही मात्र त्यांना टाळून पुन्हा कामातच हरवणार
मानलं काम पूर्ण करणं हा आपला farz आहे,
पण Exercise ,Yoga , Meditation करणं ही आजच्या काळाची गरज आहे
पैसा कमावता कमावता आरोग्याची लावतो वाट,
अहो काय करणार एवढ्या पैशाचं जर शरीरच नाही देईल साथ!
काम करताना ही जाणवेल ऊर्जा जर मन आणि शरीर असेल स्वस्थ,
फक्त एक तास स्वतःसाठी आवर्जून द्या, मग बघा आयुष्य कसं होईल मस्त
