माणूस
माणूस
1 min
590
देवा मी शून्य आहे,
मला शून्यच राहू द्या......
मी ज्याच्या सोबत जाईल,
त्याचं मूल्य तरी वाढू द्या....
अहंकार नको देऊस देवा ,
मला साधंच राहू द्या....
जितकं दिलं आहेस देवा,
समाधानी त्यात मजला राहू द्या...
माझ्या मन कक्षेत जे येतील,
साऱ्यांना सुखी ठेव देवा....
यशाचा माज नको मला,
सदा शिष्य बनून ठेव देवा...
राग लोभ मोह माया यांना दूर राहू द्या,
आपल्यांसोबत जरा मनसोक्त जगू द्या....
चागंल्या कर्माची चांगली फळे असतात,
ती देवा मलाही डोळ्यांनी पाहू द्या.....
चराचरात तूच आहेस देवा,
माणसातील माणुसकीचं दर्शन साऱ्यांना होऊद्या.....
स्वतःसाठी सारेच जगतात देवा,
इतरांसाठी आयुष्य कसं वेचावं मलाही कळू द्या....
