माझ्यात मी उरले नाही...
माझ्यात मी उरले नाही...
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
270
माझ्यात मी उरले नाही,
तरी सुद्धा तुझ्यात मी विरले नाही,
तू न मागता झाले मी तुला दान,
बाजूला ठेवून माझी सगळी शान,
माझ्या न कळत ही तुझीच आठवण येते,
तुझ्याच आठवनीत राहणे मला मानवते ,
मनात फुलले ते एक फुल,
जे कधी होते फार मलूल,
प्रेम केले मी इतके खूळे,
की पाहू शकले नाही वातेतील अडथळे,
जगा पेक्षा खरच वेगळी होती माझी प्रीती,
परंतु कोणाला समजली नाही माझी वृत्ती,
गायली मी नेहमी प्रेमाची गाणी,
आले जरी तुज्या मुळे माझ्या डोळ्यात पाणी,
हळूवार विसरू लागले सारे काही घडलेले ,
कवीतेतून बोलू लागले दडलेले ,
माझ्यात मी उरले नाही ,
कदाचित म्हणून मी तुझ्यात विरले नाही.