माझ्या प्रिय बाबा
माझ्या प्रिय बाबा
अरे बाबा म्हणून हाक मारणारी तुझी मुलगी.
आज कुठेतरी हरवली आहे.
चल ना माझ्यासोबत,तिला शोधायला.
गर्दीत ती एकटीच भटकत आहे.
तुझ्या प्रेमाची सावली,ती पुन्हा शोधत आहे.
गजबजलेल्या प्रवासात,तिला तुझ्या हातांची गरज आहे.
डोक्यावरून हात फिरवून,बाळ मी आहे.
हे एकण्यासाठी तिचे कान आतुर आहेत.
चल ना बाबा,माझ्यासोबत तिला शोधायला.
तिच्या भटकलेल्या प्रवासाला.
तूच पुन्हा एकदा वाट दे.
तिचा हात हातात घेऊन.
तुझ्या मायेच्या सावलीत परत घेऊन ये.
प्रामाणिक पणाचा धडा,तू आज पर्यंत शिकवला.
त्यांच रस्त्यावर, तिला चालण्याची परत एकदा ताकत दे.
ही दुनियादारी खूप घाणेरडी आहे.
तुझ्यासारख,तुझ्या मुलीवर कोणीही प्रेम करू शकणार नाही.
तुझ्यासारखी, साथ तिला कुठेही भेटणार नाही.
तुझ्यासारखा,विश्वास तिच्यावर कोणीही ठेवणार नाही.
म्हणूनच बाबा,तिला तुझ्याच मिठीत कवटाळून राहू दे.
अरे बाबा म्हणून हाक मारणारी तुझी मुलगी.
आज कुठेतरी हरवली आहे.
चल ना बाबा, माझ्यासोबत तिला शोधायला
