बाबा रे...
बाबा रे...
1 min
206
बाबा रे, तुझ्यावर कविता करायला मला खूप आवडते .
पण तुझे प्रेम, शब्दात सापडत नाहीत.
कारण तुझे प्रेम, तू कधी दाखवून करत नाहीस.
तुझी लेक मी लाडकी,
पण लेकी सारख कधी वाढवला नाहीस.
वाघासारखा स्वतंत्र जगायला तू शिकवलास.
तुझे शब्द मला नाराज करतात.
पण त्याचा अर्थ कळतात.
अभिमान वाटतो रे बाबा ह्दयात.
तुझ्या इतकं प्रेम माझ्यावर कोणी करत नाही.
आणि तुझ प्रेम, माझ्याशिवाय,
कोणालाच समजणार ही नाही.
बाबा रे मला माहित आहे.
माझ्या डोळ्यातील पाण्याची किंमत,
तुझ्यासाठी असंख्य वेदनेन भरलेल्या सागर आहे.
म्हणून या जगात मला माझा बाबा आईपेक्षा प्रिय आहे.
मला जितके जन्म मिळेल.
तितके तूच माझा बाबा आणि मी तुझी लेक असू दे.
