माझ्या मैत्रिणी
माझ्या मैत्रिणी
मैत्रिणी साऱ्या माझ्या जगतात मस्तीत
गप्पांच्या मैफिली सदैव असतात सजवीत
मुलं-मुली बरोबरीची वयात आलेली
तरीपण या शाहरुख रणवीरवर जीव टाकतील
ना कोणाला अभिमान ना गर्व कशाचा
मदतीला धावतील विचार न करता कशाचाच
कोणी ग्रीन टीच्या आधारावर वजन कमी करतात
योगसाधना प्राणायामचा आधार घेत राहतात
कोणी लावते केसांना डाय मटकतात हाय हिल्स घालून
वन पिसमध्ये दिसतात सुंदर आत्मविश्वासाने सजून
प्रतिकूल परिस्थितीत पहाडासारखी मागे उभी राहते
चुकांना माफ करण्यासाठी आभाळाएवढं मोठं मन करते
एकमेकींना जीव लावतात माझ्या या सख्या मैत्रिणी
पुन्हा कधी भेटणार हे विचारतात एकमेकींना सार्याजणी
प्रत्येकीच्या वागण्यात असतो खरेपणा भरलेला ठासून
मनात येईल ते देतात एकमेकींना बिनधास्त सुनावून
प्रार्थना आज साऱ्या मैत्रिणींसाठी
वाढणार्या वयाला ठेवा नेहमी दूर
राहा सदैव आनंदी आणि निरोगी
तारुण्याच्या उत्साहाचे आळवत रहा सूर
