माझं कोकण
माझं कोकण
1 min
188
कोकण सोडलं की आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं,
कोकण सोडलं की अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं,
जशी वडाची झाडे मोठी होऊनही ती मातृभूमिकडे झुकतात,
तसेच कितीही दूर गेले तरी पाय परत कोकणाकडे वळतात,
दगड झालो तर सिंधुदुर्ग किल्ल्याचा होईल,
माती झालो तर कोकणची होईल,
पाणी झालो तर काळा तलावाचे होईन,
आणि जर पुन्हा मानव जन्म मिळाला तर फक्त आणि फक्त कोकणचा होईल,
जग असेल खूप भारी पण माझं कोकण त्याहून खूप लय भारी...
