Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Jagannath Gagre

Others

3  

Jagannath Gagre

Others

माझी विठ्ठल रखुमाई

माझी विठ्ठल रखुमाई

1 min
1.4K


माझ्या कष्टाळू तो बाप मायाळू ती आई ,

सर्व कामात उभी ही माझी विठ्ठल रखुमाई ॥ धृ ॥


करती उन्हात ती काम

 नाही क्षणभरही आराम ,

काम करता करता 

येतो मस्तकी तो घाम .

तुमचा थेंब भरतो घाम आम्हाअमृतधारा राही ॥१॥


संसार गाडा चालवीत तो 

चार पायांचा तो रथ ,

असो संकटे वा सुख 

चाले त्याला सर्व पथ . 

टेकवितो मी माथा या संसाररथापायी ॥ २ ॥


तुम्ही किती सोसतात दुःख 

करता अपार हे कष्ट ,

माझ्यासाठी आहात तुम्ही

 सर्व जगा पेक्षा श्रेष्ठ .

तुमचा सहवास घडोनी धन्य माझे जीवन होई।।३॥


करती कितीही ते काम 

तरी असे प्रेमळ स्वभाव ,

असे खायास मीठ भाकरी

 तरी नसे सुखाचा अभाव .

तुम्हा सारखे मायबाप पुन्हा कधीही होणे नाही ४।।


तुमचा प्रत्येक तो शब्द 

मला अमृत रुपी वाटे ,

तुम्हासारखे माय बाप 

म्हणजे पुण्य कर्माचे साठे .

तुम्हा सारखे दैवत‍ प्रत्येक घरोघरी राही ॥ ५ ॥


Rate this content
Log in