माझी ती नमाई..!
माझी ती नमाई..!
1 min
379
तुझ्या मायेचा पाझर
वाहे माझ्या अंगणात
तुझ्या रंगलेल्या गाथा
मनी साठवीन आत..!!
माझ्या नमाई चे गान
गातो पहाटेच्या पारी
सारे ऐकुनिया येते
माझ्या मनाशि उभारी..!!
भरल्या शेताच्या साळीवर
सोन माझ डोले
माझा बाप पुढे चाले मागे
नमाई ही बोले.!!
तुझ्या घामाचा ग वास
माझ्या अंगाला ही येई
तीर्थ बनुनिया जीवन
माझे न्हाऊनिया जाई..!!
दिस माथ्यावर येतो माय
घामाने लिभते,
तिच्या घामाचे ते ऋण
माझ्या जिवनि रहाते.!!
मिठ भाकर करुनि माय
पोरांना जगवि
तिच्या पोटाचि ती भुक
कधि कुणा ना दाखवि.!!
वेळा-काळा साठी
मायमाझी धाउनिया जाई
तिच्या कर्माचे हे फळ
तिला उचलुन घेई..!!
कुठे रंगला हा पाठ
माझ्या कोकणाच्या ठायी
साऱ्या जगाला स्मरुनी
सांगे माझी ती नमाई !!
माझी ती नमाई..!!!
माझी ती नमाई..!!!!
