माझी कविता आहेस तू,,
माझी कविता आहेस तू,,
1 min
204
एक भाषा आहे ती फक्त नजरेची नजरेला कळते।।
हृदया चा ठाव घेत मनातल्या भावनांचं दर्पण करते।।।
एक भाषा आहे ती फक्त नजरेची नजरेला कळते।।
आणि तीच भाषा मयुरची लेखणी आपल्या कवितेत व्यक्त करते।।।
----------------------------------------------------------------
स्वप्न नाही माझा ध्यास आहेस तू।।
फक्त सोबती नव्हे तर खास आहेस तू।।
माझ्या आठवणीतला प्रवास आहेस तू।।
आणि म्हणूनच माझ्या कवितेतला सार आहेस तू।।
माझ्या प्रत्येक कृतीतला विचार आहेस तू।।
माझ्या हृदयातला सम्मान आहेस तू।।
माझ्या सुंदर दिवसाची सुरुवात आहेस तू।।
आणि म्हणूनच माझ्या कवितेतला सार आहेस तू।।
माझ्या हृदयातला भाव हा लेखणीपरेंत आणण्यासाठीचा
प्रवास आहेस तू।।
माझं विनाकारण हसण्याचा कारण आहेस तू।।
आणि म्हणूनच माझ्या कवितेतला सार आहेस तू।।