माझी गाय
माझी गाय
1 min
227
पोटात भुकेचा उठता डोंब,
त्या वासराचा हंबरडा फुटला.
अन् मेलेल्या गाईला पाहुन,
जीव माझा तीळतीळ तुटला.
खूप तडफडली ती, पोटात पडली आग.
गाय माझी गेली, राहिला मागे तो माग.
शेवटी न्हेताना तिला,
थरथरला माझा हात.
खुप केली होती दवा,
पण नशीबाने सोडली साथ.
पुरून तिला आलो,
पण तुटली नव्हती माया.
रिकाम्या दावणीकडे पहातां,
खचली माझी काया.
पुन्हा एकदा त्या वासराचा,
आकांताने हंबरडा फुटला.
मिठी त्याला घेता;
अश्रूवरचा ताबा मात्र सुटला...
