माझी बाहुली
माझी बाहुली
2 mins
1.2K
किती काळ लहान राहू,
विचारले आईला, “कधी ग मी मोठा होणार?”
“लवकरच बाळा”, बोलली आई,
“आमच्या घरी एक बाहुली येणार”.
नाकाच्या शेंड्यावरचा राग,
प्रत्येक मिनिटाला चढतो.
आता त्या बाहुलीचे मी,
स्पष्ट वर्णन करतो.
मी शाळेत गेलो की,
रस्त्यावर डोळे जडून, खिडकीत बसते.
दरवाजा उघडून मला पाहिले,
की मनसोक्त हसते.
एरवी ती मस्ती करत नाही,
पण कधीतरी फार चुकीची वागते.
मग मी रागवलो की,
जोरजोरात रडू लागते.
तिच्याशी भांडलो की, आई म्हणते,
“बाळा तू मोठा आहेस ना, तुला समजत नाही?”
पण काय करू, तिची खोड काढल्याशिवाय,
मला करमत नाही.
माझ्या अवतीभवती फिरत राहते,
जणू माझी सावली.
“दादा” “दादा” म्हणून थकत नाही,
अशी ही माझी गोड बाहुली
