माझे बालपण
माझे बालपण
चिमणी पाखरा सारखे
बालपण होते आमचे छान
चाँकलेट आईसक्रीम खायचा
आम्हाला मोठ्यांकडून मान....
टायर हाताने चालवून
धावायला यायची खूप मजा
आई वडिलांना माहित झाले की
हातांवर काळी मारून सजा...
नदीमध्ये पोहायची आम्हची
वेगळीच असायची टोळी
चिंचा, बोर, आंबे लपून तोडून
सापडणारी मुल होती भोळी....
रात्रीच्या अंधारातला लपंडाव
खेळायला आनंद खूप येत होता
ज्याच्यावर असायचा तो डाव
तो आम्हाला शोधायला येत नव्हता....
बालपण असायच खूप गमंतशीर
चार आठाणे गोळा सर्व करायचो
तिळाच्या, संत्राच्या गोळ्या घेऊन
एकत्र मिळुन मित्र सर्व खायचो....
खरच माझ बालपण होत मस्त
जसा मुंगी साखरेचा रवा
आता पण देवाला करतो विनंती
बालपण पुन्हा एकदा देगा देवा....
