STORYMIRROR

Aaba Kale

Others

4  

Aaba Kale

Others

माझा शेतकरी राजा

माझा शेतकरी राजा

1 min
515

माझा शेतकरी राजा

कसा उपाशी राबतो

या काळ्या हो आईला

पाणी घामाचं पाजतो


रात उशाशी असताना

निम्या रातीला जागतो

पाणी शेताला हो देण्या

पांदी-पांदीनं धावतो


हात जोडतो बाबा रं

मेघराजा तू बरस

किती विनवणी करु रं

सांग किती मी वरीस


ऊन वा-यात राबतो

भिखनं पावसाचं मागतो

माझा शेतकरी राजा

राती रातीचा जागतो


मेघराजा कधी सांग

काळी आई ही भिजल

शेतक-याच्या झोपडीत

अन्न सुखाचं शिजल


जोडी बैलाची बोलते

कशी डुलत चालते

मेघराजाच्या येण्याने

पिक पिक हो फुलते


माय माती हो माझी

बाप पाऊस झालाय

या शेतकरी लेकाला

मोठं शेतीनं केलंय


साहित्याला गुण द्या
लॉग इन