माझा छंद
माझा छंद
1 min
337
लहानपणीचे माझे मित्र
तोच माझा आवडता छंद
लपंडाव खेळण्यात
मी असायचो बेधुंद...
चित्रकला आमचा
सर्वात आवडता विषय
काढायचो वाघ, सिंह
मुलांना वाटे त्यांचाच भय....
मातीचे घर, रेतीचे घर
बांधायचो खुप छान
ताजमहाल राजा राणीचे
दिसायचे रूप छान...
चित्रकला मध्ये आवड
म्हणून झालो चित्रकार
आता कमाई आहे एवढी
घरासमोर लागली माझ्या कार...
कवीता लिहण्याची मला
सवय जडली नवी
लिहून गमतीशीर कविता
मी झालो आता कवी....
