माझा बळीराजा
माझा बळीराजा
1 min
289
माझा बळीराजा! शेतात राबतो!
देह झिजवितो! दिन रात!१!
कष्ट करूनिया! धान्य पिकवतो!
बैलांना पोसतो! शेतासाठी! २!
शेतकरी माझा! राहू द्याहो सुखी!
अन्न देतो मुखी! जनतेच्या! ३!
उन्हात तानात! नित्य गाळी घाम!
धान्या नाही दाम! चिंता करी! ४!
जगाचा पोशिंदा! करी काम धंदा!
कुणी निंदा वंदा! शोक नसे!५!
माझ्याही धन्याला! बैल आणि गाय!
साथ त्याला हाय! संकटात! ६!
घर धनी माझा! लई करी कष्ट!
होवू नका रुष्ट! त्याच्यावरी!७!
जगतांना त्याला! द्याहो थोडी साथ!
करी सदा मात!संकटात!८!
घेऊ नको देवा! परीक्षा अघोर!
दूर कर घोर! पोशिंध्याचा!९!
मंगला देवाला! करीते विनंती!
दूर करा भीती!त्याची जरा!10!
