'माझा भारत देश महान'
'माझा भारत देश महान'
1 min
618
माझा भारत देश महान,
जगी आहे मोठी याची शान.॥धृ॥
नानाविध धर्म नांदती,
जाती-पाती इथे हो किती.
जरी धर्म वेगळे,
जाती पाती वेगळ्या,
आहे सर्वांना देशाभिमान.
माझा भारत देश महान.....॥१॥
हिमालय मुकूट शिरी,
चरणकमल हिंदसागरी.
सह्याद्रिच्या कडा,
साथीला सातपूडा.
रक्षिण्या रांगा याच्या महान.
माझा भारत देश महान....॥२॥
इथे भाषांचा जमला मेळा,
मेळ्याला एकिचा रंग आला.
आमच्या भाषा अलग,
आमचे धर्म अलग.
तरी देशासाठीच आमचे प्राण.
माझा भारत देश महान....॥३॥
भारत देशाचे नंदनवन,
जम्मु-काश्मिर आमूचा हो प्राण.
जणु पृथ्वीचा हिरा,
राष्र्टमुकूटाचा तुरा.
हिमालयाची याला कमान.
माझा भारत देश महान...॥४॥
देई जगाला माझा हो देश,
धर्मसहिष्णुतेचा संदेश.
नाही इथे धर्मांधता,
नांदे सदा समानता.
असा देश माझा,माझी शान.
माझा भारत देश महान....॥५॥
