माझा बाप शेतकरी
माझा बाप शेतकरी
1 min
157
शेतात गाळीतो घाम
माझा बाप शेतकरी
घेऊन संसाराची नांगर
चालवतो बाप कष्टकरी....
भर पावसात बैलजोडी
घेऊन निघाला शेतात
करून पेरणी बियांची
उत्पन्न मिळेल हातात....
लाखो रूपयांचा जुगार
काळ्या मातीत खेळतो
पिक जरी सार करपल
तरी माझा बाप नाही रळतो..
मुलीच्या लग्नासाठी स्वताला
सावकाराकडे ठेवतो गहाण
लग्नात हुंडा देऊन थाटामाटात
बाप सर्वांचा करतो मानपान....
गर्वाने सांंगतो जगाला
असा होणार नाही मानकरी
काळ्याच करतो पिवळ सोनं
तो माझा बाप शेतकरी....
