मागणं
मागणं
1 min
206
देवाकडे हट्टानं, नाही काही मागायचं
दान त्याचं प्रसाद म्हणुनं, आनंदानं घ्यायचं
कधी काय द्यायचं, त्यालाच फक्त कळतं
असंच तो देतो, जे अपल्याला पेलतं
कृपा त्याची हवी, तर सामर्थ्य मिळवायचं
कष्टानं चिकाटीनं स्वतःला घडवायचं
मग त्याला आपल्याकडे, बघावच लागत
मनातलं सारं कसं, द्यावच लागतं
तरीसुध्दा नाही दिलं, तरी नाही रुसायचं
लगेच दुसरं कुठलं, टोक नाही गाठायचं
असेल त्याची मजबुरी, असं समजायचं
बाप्पासाठी अपण, थोडंसं सोसायचं
आपल्या बाप्पासाठी, आपण थोडंसं सोसायचं!
सोसायला बळ मात्र हक्कानं मागायच
