STORYMIRROR

Rasika Patil

Others

3  

Rasika Patil

Others

लपाछपी

लपाछपी

1 min
382

आठवण तुझी सारखी येत राहते,


मन माझे उचंबळून येते।


वाटते आत्ता येशील,


नी माझ्या मनाला मलम लावशील।


मनाचे घाव भरता भरत नाही,


तुझ्या आठवणींशिवाय काहीच कळत नाही।


कुठे लपून बसलास रे,


मला एकटीला सोडून;


थकले रे मी,


तुला सगळीकडे शोधून।


ठेव रे तुझा हात माझ्या गालावर,


पाहुदे मला गोड हसू तुझ्या ओठांवर।


मला पण जायचेस ना बरोबर घेऊन,


गेलास सोडून एकटीला रडायाला राखून।


खरंच आता ये रे परत,


तुझ्याशिवाय मन नाही रमत।


अश्रूंचे बांध सांधत नाही,


आठवणी तुझ्या थांबत नाही।


आयुष्याच्या लपाछपीत


खूप शोधले तुला,


पण तू लपून बसलास तो कायमचा…


Rate this content
Log in

More marathi poem from Rasika Patil