लॉकडाऊन
लॉकडाऊन
रस्त्यावरची वाहतूक बंद झाली
रेल्वेसह विमानसेवा ही ठप्प झाली
अन् लॉकडाऊनची घोषणा झाली
बघता, बघता देवळे-दुकाने बंद झाली
अत्यावश्यक सेवा फक्त सुरू राहिली
पहिला लाॅकडाऊन सगळेच नवे
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लावले दिवे
मास्क आणि सॅनिटायझरचा वापर फार
त्यातही काहींनी केला भ्रष्टाचार
पण काहींनी दिला एकमेका आधार
माणसांचे नवे रंग कळले
दुसरे लाॅकडाऊन सुरू झाले
वर्क फ्राॅम होमचे स्वागत झाले
पण नंतर खरे मर्म जाणवू लागले.
राहा चोवीस तास ऑनलाईन
कितीही तुमचा दुखला जरी स्पाईन
काही ठिकाणी समानता आली
कामाची समप्रमाणात विभागणी झाली
काही ठिकाणी मात्र तसेच सारे
जेवायला मात्र हवेच सारे
पाकक
लेची जणू स्पर्धा लागली
पदार्थांसह सेल्फी झळकू लागली
नव्याचे नऊ दिवस संपून गेले
लोक आता कंटाळून गेले
ऍलोपॅथी, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी
आयुर्वेद सारे मदतीला धावले
ज्याला जे रुचले ते त्याने घेतले
कोरोनासारखी लाॅकडाऊनची संख्या वाढली
सर्वांची घालमेल सुरु झाली
कोरोनाबरोबर लोकांनाही आवर
घालण्याचे काम करावे लागले
शासनाचे प्रयोग संपले
अनलॉक जरी सुरू झाले
लोक आहेत धास्तावलेले
गावी गेलेले परतताहेत कामासाठी
आशा आहे त्यांना मिळेल रोजीरोटी
रोजचे जीवन सुरळीत चालावे
असेच आता वाटते व्हावे
प्रत्येक हाता काम मिळावे
तरीही बेफिकीर राहून चालणार नाही
म्हणजे अशी वेळ पुन्हा येणार नाही