लोक काय म्हणतील
लोक काय म्हणतील
1 min
519
आयुष्य एकदाच मिळतं
अगदी मनसोक्त जगायचं
कशाला विचार करायचा
लोक काय म्हणतील काय उत्तर द्यायचं ?
खरतर आपण जगतो कसं माहिती आहे
लोकांना काय आवडतं ते करायचं
मनासारखं जगलो तर
लोक काय म्हणतील काय उत्तर द्यायचं?
हे करू की ते करू
भान राखायचं प्रत्येकाच्या मर्जीचं
माझं स्वतःच काही मत आहे हेच विसरायचं
कारण लोक काय म्हणतील काय उत्तर द्यायचं?
कोण ती लोक कुठे असतात
असतील आजूबाजूलाच
कदाचित तेही करत असतील विचार
लोक काय म्हणतील काय उत्तर द्यायचं?
