लेकीच लग्न
लेकीच लग्न
1 min
259
आली आली लग्न सराई
माझ्या घरी लेकीची
पाहुने येती, लेकीला बघती
सुपारी फोडती, मुहूर्त बघती
लग्नाची धावपळ असे
आनंदाचे वातावरण असे
लग्नासाठी मुलीच्या घरी
पाहुणे मंडळी नसतील घरी
बापाची धावपळ असे
लग्नाच्या तयारीची
खुप सारा बस्ता बांधती,
रीती रिवाज खुप करती
निमंत्रणे सगळ्यांना असे
लग्नासाठी पन्नास माणसे
ती फक्त गावातली असतील
पाहुने लग्न Live बघतील
अटी नियम खुप असल्याने
लग्न मात्र साध्या पद्धतीने
जल्लोष मात्र खुप असे
चेहर्यावरी आनंद असे
मुली वरी माया असे
लहान पणीचे दिवस आठवे
आनंदाचे अश्रू असे
लेकीच्या डोक्यावरी मायेचा हात असे
