लेक
लेक
1 min
293
लेक म्हणजे माळाधील एक होत
लेक म्हणजे गळ्यातील पोत
लेक म्हणजे साखरीचा दाणा
लेक म्हणजे खूप सा-या गोष्टींचा कारखाना
माय बापाची आहे ही लाडकी
झाडावरची एक काडी
आजी आजोबा यांची नेहमी देते साथ
आणि मग झाली मोठी की धरते दुसऱ्याचा हात
लेक आहे जीवाला मूल्यवान
त्यामुळे करा नेहमी तिचे सन्मान
का होत आहे तिचे अपमान?
जेव्हा नाही केले तिने काही खोटे काम
लेक लावते सर्वांना जीव
मग का नाही येत कुणाला तिचं कींव?
ही बोलकी चिमणी कधी रूसु नये
आपली लाडकी कधी लांब जाऊ नये
