लेक आई बाबांची
लेक आई बाबांची
1 min
257
बाबा नका हो रडू असे आज
जीवनातला आज माझ्या महत्त्वाचा क्षण
जातेय आज मी परक्या घरी
तुम्हीच म्हणालात लेक परक्याच धन |
बाबा मी लेक तुमची
आई मी तुझी लाडली
दादा मी तुझी ताईडी
प्रेमाच्या सावलीत तुमच्या वाढली |
आज मी जातेय सासरी
आई बाबा नका लाऊ जीवा घोर
तुम्ही दिलेले संस्कार बाळगूनी
होईन मी सासरी गुणी फार |
बाबा तुमच्या पाणावलेल्या डोळ्यात
मला दिसते माझ बालपण
अश्रूंचा तो थेंब सांगे मजला
परक्या घरी सोपतोय तुझ तरुणपण |
आईबाबा तुमच्या मायेच्या सावलीतून
आज मी बाहेर पडतेय
दादा तुझी ताईडी
आज सासरी जातेय |
कन्यादान हे तुमचं बाबा
विसरणार नाही कधी मी
सोबत घेऊनी जातेय आठवणी
सदैव तुमच्याच पोटी जन्म घेईन मी |
