कविता
कविता

1 min

328
जीवाचे रान करुनी
रक्ताचे पाणी करुनी
देहाची पर्वा न करता
चंदनासारखे झिजुनी
लिहिली घटना भिमरायानी
सर्व जातीना एकत्र करुनी
अस्पृश्य समाज लढ्यात उतरवुनी
सनातन्याना अहिंसेचे दर्शन घडवुनी
चवदार तळ्यावर हक्क बजावुनी
दलिताच्या क्रांतीची मुहुर्तमेढ रोवुनी
मानसिक गुलामीची श्रृंखला तोडुनी
लिहीली घटना भिमरायानी
वर्णविरहित समाज उभा
संवाधानात दिसतो आहे
न्याय ,स्वातंत्र्य,समता,बंधुता
आहे घटनेच्या या पानोपानी
मार्ग दाविला वंचिताना
बुद्धाची सम्यक दृष्टी रुजवुनी
लिहिली घटना भीमरायानी
मनुस्मृतीची सती कहानी
मनुला या मातीत गाडुनी
घटनेमुळे राष्ट्रपती महिला झाली
संविधानात मानवता आली
ज्ञानाने वैऱ्याला झोडुनी
स्त्री हक्क दिले पानोपानी
लिहिली घटना भीमरायानी