क्षण
क्षण

1 min

232
काही क्षणांच्या आठवणी होतात,
आनंद अन् सुख देण्यासाठी|
काही क्षणांच्या साठवणी होतात,
कटूता, दुःख व अपमान विसरण्यासाठी|
काही क्षण मनाला स्पर्शून जातात,
फिरून पुन्हा कधी न परतण्यासाठी|
काही क्षण फुलाप्रमाणे फुलतात,
कोमजले तरी कायम सुगंध देऊन जाण्यासाठी|
काही क्षण मनाच्या गाभाऱ्यात रेंगाळतात,
संधी मिळाली की, बाहेर डोकावण्यासाठी|
काही क्षण विचारांच्या जाळ्यात दडलेली असतात,
बंधने भेदून मुक्त संचार करण्यासाठी|
काही क्षण वाळूच्या काणांसम एकत्रित येतात,
हातात आले तरी हळूच नकळत निसटण्यासाठी|
पण एका क्षणासाठी मात्र आपण करतो जीवाचं रान,
चातकाप्रमाणे पाहतो वाट, त्याचचं नाव "समाधान"|