क्षण निरोपाचा
क्षण निरोपाचा
1 min
367
गर्दीत माणसांच्या
मीच मलाच भ्यालो
सरणावरी ठेवून मी
जरासा दूर झालो...
एकटाच मी तळपत
निखा-यावरती घाव
झेलीत मोजीत होतो
नेत्रधारेत भिजे सारा गाव..
दूरुन पाहत होते सारे
दुःखाच्या दूर खाईत
माना खाली वाकून
सा-यांचा म्हणे ताईत,,,
जवळचे परके सारे
घरी निघून गेले होते
आकाशी झेप घेऊन धूर
नाव तयांचे अमर राहते...
झाकला सूर्य अंधार
पडला कायम रात्रीचा
इथचं सर्व काही सोडून
मुक्काम क्षण निरोपाचा...
