कोरोनाचे संकट
कोरोनाचे संकट
1 min
97
आज सर्वांची झाली आहे धावपळ,
एका विषाणूने घातला आहे धुमाकूळ
वाऱ्या सारखा पसरत आहे हा विषाणू,
त्याला थांबवणे अशक्य झाले आहे जणू
शहरात कमी झाली प्रदूषणाची गती,
नोकरीवाल्यांना आहे नोकरी जाण्याची भीती
व्यवसायात आली आहे थोडी मंदी,
शेतकरी राजाच्या कामाला नाही आहे बंदी
डॉक्टर नर्स पोलिस करत आहे आपले काम,
त्यांच्या प्रयत्नांना करू आपण सलाम
आली उपासमारी झाले आर्थिक नुकसान,
वाचव देवा आता पायी चालणाऱ्या मजुरांचा प्राण
लावा तोंडाला मास्क लावा हाताला सॅनिटायझर,
हे उपाय करून आपण करू कोरोना चा कहर
