कोरोना
कोरोना
थैमान घातलंय हो कोरोनाने आज साऱ्या जगात,
या विषाणूच्या संपर्कात आलेला जातोय की हो ढगात !!
तीन महिन्यापूर्वी चीनमध्ये हा रोग झाला दाखल,
निष्काळजीपणामुळे त्यांनी घेतली नाही याची दखल !!
एक एक करत सगळे देश या रोगाने भंडावलेत,
जगात सुपरफास्ट असणारे देशही आज थंडावलेत !!
जिथे तिथे आज पाळला जातोय संपूर्णतहा बंद,
रोज धावपळ करणारे नागरिकही बसलेत घरात थंड !!
ऑफिसवाल्यानी दिलाय 'वर्क फ्रॉम होम' चा नारा,
या विषाणूला संपवायला आज एकवटलाय जग सारा !!
ज्यांना ज्यांना झाली लागण या 'कोरोना' रोगाची,
गरज पडली म्हणून त्यांना वेगळं वेगळं ठेवण्याची !!
पोलीस यंत्रणा, सफाई कामगार आणि डॉक्टर
या सगळयांना "नीरज"चा सलाम आहे,
कारण स्वतःचा जीव धोक्यात घालून ते वाचवित हर एकाचा प्राण आहे !!
आता फक्त एकच प्रार्थना देवाकडे या रोगाचे औषधं लवकर सापडू दे,
जीवाशी खेळणाऱ्या या भयंकर रोगाला औषधानेच झापडू दे !!
