Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Bhagwat Deshmukh

Others

3.5  

Bhagwat Deshmukh

Others

कोरोना झोन

कोरोना झोन

1 min
162


ग्रीन, ऑरेंज, रेड आले आता तीन झोन

देशभर पसरले बघा याचेच सारे लोन ||


पृथ्वीचा झोन पूर्वी ग्रीनच दिसत होता

मावळतीचा सूर्य ऑरेंजच दिसत होता ||


सिमेंटच्या जंगलांनी पृथ्वी गेली झाकून

अन गाड्यांच्या धुराने सूर्य गेला माखून ||


क्रांतीचे प्रतीक म्हणून रंग होता रेड

आता याची ओळख कशी तर सर्वात जास्त बेड ||


करोना महामारीची सर्वांनीच घेतली धास्ती

प्राण्यांना मारून कश्याला करायची मस्ती ||


ग्रीन झोन म्हणता म्हणता रेड झोन आला

घराबाहेर फिरणारा डोळ्या देखत मेला ||


पेराल तेच उगवाल हीच आहे नित

शासनाने देखील मुभा दिली बसा आता पीत ||


यांच्या पिण्याने म्हणे महसूल शासनाचा वाढेल

महसुला पेक्षा देखील संख्या कोरोनाची वाढेल ||


तीन झोन संपून जिल्हे होतील हॉट स्पॉट

संख्या एवढी वाढेल की शिल्लक नसेल कॉट ||


सांगून सांगून थकलो रोग चालला बळावत

आता तरी सुधारा लोकहो हात जोडतो भागवत ||


Rate this content
Log in