कोरं पान
कोरं पान
1 min
317
डायरी हातात घेतली,
म्हटलं आज काही लिहावं.
शब्दांच्या त्या मुसळधार पावसात,
आज मनसोक्त भिजावं.
सुरुवात करणार इतक्यात लक्षात आलं,
आज शब्दच सुचेना.
विचारांचा त्या अनियंत्रित गर्दीत,
शब्द काही केल्या सापडेना.
डोळे मिटून पहावे म्हटलं तर,
दिसला केवळ तीव्र अंधार.
शब्दांचा खेळात मोहून जाण्यास,
आज झाले मी लाचार.
शब्दांची साथ मिळेना म्हणून,
हरपले माझे भान.
आज काट्यांपेक्षाही जास्त टोचत होतं,
डायरीचं ते कोरं पान.
