STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

कोण देव

कोण देव

2 mins
258

देव कोण आहे ? कुठे आहे देव ? कसा आहे देव ? काय केले देवाने ? कुठे भेटेल तो देव ? भेटल्यावर माझे स्वप्न पुर्ण करेल का ? कसा भेटनार तो देव ? 

सारखे प्रश्न मनात येत असतात पण खरचं देव आहे का.? किती पुजा पाठ केलेत, किती तरी उपवास केलेत , किती तरी नद्यामध्ये शरीर धुऊन आलोय , तरी सुध्दा देव नाही दिसला..

तो देव नाहीच तर का त्याची येवढी मनात श्रध्दा ? का येवढी आपुलकी ? का येवढा आदर ? का येवढा सन्मान केला जातो ? का त्याला पंचपकवानाचे भोग लावल्या जातात..?

का ? का ? का ...?

उत्तर कुनाकडेच नसते तरी देव हा सर्वाचा जगत पिता आहे . 

लहाण पणा पासुन मी कधी देव नाही बघीतला पण मंदिरात मात्र नेहमी जातो , त्या दगडाच्या मुर्तीला नमस्कार करतो , त्याला सर्वाचे दू:ख घ्यायला सांगतो , आणि मला सुध्दा सुखी ठेव प्रार्थना करतो! 

मग येवढं सर्व करुन सुध्दा कधी देव दिसला नाही ! माझं सोडा माझ्या मनात कपट असेल पण तो रात्रदिवस त्या दगडाची पुजा करतो त्याचे नाम स्मरन करतो त्याला का देव प्रसन्न होत नाही....??


देवाची मस्ती किंवा टिंगल उडवत नाही मी हा प्रत्येकाचा विचार आहे की आपल्या मनात काय ठेवावं आणि काय नाही ते...

पण विचार करण्यासारख्या असंख्य गोष्टी जेव्हा समोर येतात तेव्हा कळतं की देव नाही !

गोष्ट कशी आहे ! आपल्याला जे संस्कार दिले त्याला धरुन आपन चालतो , ज्या कथा आपन वाचल्या त्या मनात धरतो , आणि त्याच गोष्टी आचरनात घेतो हे आपले संस्कार !

मी पण तुमच्या सर्वासारखा आहे देवाला बोलायचा काही अधिकार नाही मला पण जिथे देवचं दिसला नाही 

तिथे....... त्या देवाला..श्रध्दांजली द्यायची कशी ? 


माफ करा काही चुकीचं बोललो असेल तर

खुप गोष्टी अश्या आहेत की त्या बोलुन सुध्दा पुर्ण होऊ शकत नाहीत आणि जे आहे आपन त्या कडे कधी लक्ष देत नाही ! देव तुमच्यात आहे देव आपल्यात आहे ! 

त्या दिवशी नेहा mam बोलल्या होत्या 'शोधा म्हनजे सापडेल' ! तसेच देव मानसात शोधा म्हनजे सापडेल.....


Rate this content
Log in