कन्यादान
कन्यादान
जपल होतं तिला काळजापरी
का सोपा व लागलं तिला परक्या हाती....
हास्य होती ती माझ्या संकट काळातील
गृहलक्ष्मी होती ती माझ्या घरची
का सोपा व लागलं तिला परक्या हाती...
ओंजळ माझी भरायची तिच्या हास्याने....
कधी माझी बहीण तर कधी माझी आई होई...
कधी खोडकर लेक तर कधी सखी होई...
का सोपा व लागलं तिला परक्या हाती...
घर माझं आनंदाने भरी तिच्या गोड बोलानी....
तिच्या पावलाने घर माझं सूखाणे भरी...
दुःख माझ्या मनीचे तीच जाणे..
का सोपा व लागलं तिला परक्या हाती...
तुळशी होती ती माझ्या अंगणातील..
शोभा होती माझ्या घराची ....
मान अभिमाना होती ती माझ्या घरची...
का सोपा व लागलं तिला परक्या हाती...
का ह्या जगाने ही रीत बनवली??
का हळवा क्षण बापाच्या पदरी पाडला???
लेकीच्या सुखा साठी आनंद व्यक्त करावा,
की तिच्या विरहात झुराव???
कस हे कन्यादान बापाच्या पदरी पडलं...??.
