कीर्ती महाराष्ट्राची !!!
कीर्ती महाराष्ट्राची !!!
महाराष्ट्र ही संतांची भूमी,
मुक्तबाई , ज्ञानेश्वर , जनाबाई , गोरोबा.
यवनांवरी मात करी जिजामाता व शिवराय,
संगतीस प्रजेचा अभिप्राय.
यवनांच्या भयानक प्रलयाच्या लाटा,
कोसळल्या महाराष्ट्रावरी,
यादवांनी, शिवरायांनी, बाजीप्रभूंनी आणि इतर वीरांनी रोखून धरल्या त्यांना तळहातावरी.
संतांच्या ममतेची माया,
याद राखिली मरहट्टयांनी,
जगदंबेने शिंपले लखलखीत पूर्णचंद्र या पवित्र भूमीवरी.
तोरणा ते सज्जनगड,
सारे परतले स्वराज्यात,
पैठण ते देवगिरी सारे गाजले
वीरांचे पराक्रम कायमस्वरूपी मातीत रुजले.
दोनशे वर्षांची काळ रात्र संपली,
शिवरायांच्या जन्माने,
व राज्य ज्योतिषी शिवनाथांची,
भविष्यवाणी ठरली खरी.
वीरपत्नी, वीरमाता, राजमाता, महाराणी,
जिजाऊंच्या उदरी जन्मला महाराष्ट्राचा भाग्यविधाता.
तानाजी, बहिर्जी, कोंडाजीचे वीर मरण,
ठरले मराठी मातीचे धन !
थोरल्या बाजीरावांनी गाजवला मोठा पराक्रम.
सदाशिव भाऊ, माधवराव, व रमाबाईंनी,
स्वरूपीले इतिहासाचे पान थोर !
पानिपतच्या लढाईत गेले सर्वच वाहून,
पण मराठमोळ्या मातीत राहिले वीरांचे रक्त झिजून !
पुढे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले ठरले गुरु महान,
खेचूनी शिक्षणासाठी तहानलेल्या शिष्यांचे ध्यान.
अशा ह्या महान भूमीचा इतिहास,
होईल सर्वांना ग्याय,
जेव्हा आठवतील ते थोर रक्तपात !!!
