खरं जीवन
खरं जीवन

1 min

38
हे मानवा,
माणूस म्हणूनी जन्माला आलास,
"माणूस" बनुनी जगतोस का?
धकाधकीच्या जीवनाशी लढताना
"सूक्ष्म" चुका करतोस का?
पैसा-अडका [लक्ष्मी] असूनही तू
अहंमपणा ठेवतोस का?
गरीबांना प्रेम भाव देवूनी तू
त्यांच्या दुःखात साथ देशील का?
मी, माझं किती दिवस करशील
स्वः ला कधी ओळखशील का?
आलास नंगा, जाशीलही नंगा
"माझं" म्हणणारं सोबत नेशील का?
सृष्टीचा निर्माता तो एकच "ईश्वर"
त्याच्याशी एकरूप होशील का?
प्रेम, आनंद, मौन, संतुष्ट राहूनी
सर्वांना सुखात ठेवशील का?