खेळणी
खेळणी
1 min
324
दिसते छान
पंखवाली परी
फ्रॉक भरजरी
व्वा! काय शान!
गोबरे गाल
केस भले मोठे
चाललीस कोठे
भलता ताल
चेंडू नि फळी
विटी आणि दांडू
खेळ सारा मांडू
खुलते कळी
अगीन गाडी
चाले झुकझुक
धूर भूकभूक
सोडे धुराडी
चावी देतात
या चारचाकीला
सोडताच तिला
धावे जोरात
संसार सारा
मंडळी जमली
खेळ भातुकली
झाला पसारा
