कधीतरी शोधशील मला ही तु
कधीतरी शोधशील मला ही तु
कधी तरी मला ही शोधशील तु
शांत रात्री बाहेर पहुडलेला असताना
आकाशातील त्या गात्र चांदण्यात...
कधी तरी मला ही शोधशील तु
तुझ्याच अंगणात बहरलेल्या
त्या मोगऱ्याच्या सुगंधात...
कधी तरी मला ही शोधशील तु
स्वतःला आरश्यात न्याहाळताना
तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्यात...
कधी तरी मला ही शोधशील तु
पावसाच्या सरिंमध्ये भिजताना
सूर्याच्या किमयेन उमटलेल्या सप्तरंगात...
कधी तरी मला ही शोधशील तु
माझ्या सोबत असलेले दुवे तुझे
तुझ्या माझ्या ऋणानुबंध प्राक्तनात...
कधी तरी मला ही शोधशील तु
तुझ्या सभोवताली जगतात
सापडणार नाही मी
मुक्काम ठोकला आहे देवाच्या मनात....
कधी तरी मला ही शोधशील तु
