STORYMIRROR

Sharvari Prabhu

Others

4  

Sharvari Prabhu

Others

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी, असेल

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी, असेल

1 min
459

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी, असेल गं, 

मिठीत दाट घेऊनि मला जारा पुसेल गं.  


एक नाते ओळखीचे, एक जे नवेनवे, 

एक बंध रेशमाचे, वाटते हवेहवे, 

आज आहे, जो दुरावा, तो उद्या, नसेल गं 

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी, असेल गं  


खेळ माझ्या वेदनांचा,

डाव माझ्या यातनांचा, 

हळूहळू, जरा जरा, कधीतरी, फसेल गं  

कधीतरी, कुठेतरी, कुणीतरी, असेल गं 


Rate this content
Log in