STORYMIRROR

Milind Shintre

Others

4  

Milind Shintre

Others

काही शब्द शब्दांसाठी

काही शब्द शब्दांसाठी

1 min
300

शब्दांचे खेळ करावे.. कोंदटलेले मन मोकळे करावे..

कधी हसवावे कधी रडवावे.. शब्दांच्या या मायाजाळात अडकून जावे..!!


शब्दांना कसली सीमा नसावी ना विचारांना किनारा..

बहुमूल्य मोत्यासारखे जरी असले तरी कशाला हवा त्यांना पहारा?


शब्द कुठली भाषा जाणत नाहीत ना कुठली जात पात..

साधकाच्या मनी उमलती लेखणीतून अवतरती अगदी अलगद..!!


शब्द ना तुझे ना माझे शब्द सर्वांचे असतात..

फक्त एकदा हात पुढे करून पहा, शब्द कायमचे सोबती बनतात..!!


शब्द स्वर्गा-नरका पलीकडले, शब्द चिरंतर असतात..

अथांग अशा आकाशातील जणू चमचमणारे ते तारे असतात..!!


जुलमाविरोधात शब्दांची भवानी व्हावी.. पीडितांची ढाल व्हावी..

दुखावलेल्या घायाळ मनाला फुंकर घालणारी शब्दांचीच संजीवनी व्हावी..!!


शब्दांवर माया करावी, जरा त्यांचेही लाड करावे..

एखाद्या लहान बालका सारखे, त्यांनाही स्वच्छंद बागडू द्यावे..!!


Rate this content
Log in