ज्ञात,अज्ञात क्रांतिवीर
ज्ञात,अज्ञात क्रांतिवीर
1 min
287
क्रांती ची धगधगती
हाती घेऊनी मशाल
मातृभूमी भारताचे
तेजे उजळले भाल....
गुप्तचर क्रांतिवीर
नेतृत्वाची असे ढाल
क्रांतिवीर नेताजींच्या
जेथे लाल ,बाल,पाल...
कावा गनिमी तो फार
बुद्धी बळे करी चाल
रेल्वे लुटूनी खजिना
सारे पसार ते काल...
खून तो अधिका-याचा
स्फोट घडवूनी किती
देश सेवेसाठी फाशी
क्रांती कारक हो जाती...
नव युवकांची वेडी
इतिहास तो घडवी
देश स्वातंत्र्याची पिढी
नवी शक्कल लढवी...
क्रांती, संग्राम, उठाव
क्रांतिवीर ची अर्चना
सत्याग्रह,तो मिठाचा
केशरीची ती गर्जना...
गुप्तचर स्त्री सुगंधा
अशी लावणीची थट्टा
इंग्रजांची मती गुंग
झाला तो सुगंधी कट्टा..
रुप वासूदेव घेती
गुप्त संदेश ते देती
दूर देवाणघेवाण
कार्य थोर ते करीती...
ज्ञात अज्ञात सारेच
क्रांतिवीर ते अनाम
मायबाप देशप्रेमी
सार्थ तो देशाभिमान...
