जगून
जगून
1 min
162
तुझा हा दुरावा त्रासापेक्षा जास्त
मला तू रडवून हसत आहेस मस्त
पडले आहे तुझ्या प्रेमात ठेस लागून.....
दूर जाऊ नकोस तू मला कधी सोडून
जीव तुझ्यावर बघ माझ्यासोबत जगून....
जास्त नाही तू बदलला आहेस खूप
आवडलं ना तुला माझं सावळ रूप
तिरस्कारात तुझ्या रात्र काढीन जागून.....
माझ्या प्रेमाचं आहे तू अनमोल धन
माझ्या प्रेमावर तू करतोस संशोधन
वेड्या जगाकडून तुला मी घेईन मागून..
