जगण्याचा अर्थ
जगण्याचा अर्थ
1 min
264
सांग मनवा जीवन जगतो
तु तरी कशासाठी
मि तर जगतो निस्वार्थपणे
फक्त या दुबळ्या समाजासाठी
आपल्या देशाची लोकशाही
संविधानातुन सांग जरा
घडेल तेंव्हा भारत माझा
सुशिक्षित देश खरा
घेतो भरारी सोडून आता
खितपत पढ़लेल्या दरिद्रीला
भीमरायाने दिला आम्हाला
जगण्याचा सन्मार्ग भला
ही ऊंच इमारत तुझ्या
दोन मनगटाच्या बळावर
तू असाच जगत राहीला
तर तुला चढवतील रे सुळावर
तू जगतो आता इतरांसाठी
अरे कधी जगायच स्वत साठी
असो आपसात बंधुभाव
जगण्याचा अर्थ पोटासाठी
