STORYMIRROR

VILAS RATHOD

Others

1  

VILAS RATHOD

Others

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

जबरदस्त प्रेरणादायक सुविचार

1 min
197

1. भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.


2. स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात.


3. ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही.


4. चुकण हि ‘प्रकृती’, मान्य करण हि ‘संस्कृती’ आणि सुधारणा करण ही ‘प्रगती’ आहे.


5. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.


6. शब्दांपेक्षा शांत राहूनच जास्त आक्रमक होता येत.


7. आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.


8. नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.


9. विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात.


10. स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.


11. कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.


12. जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका, स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी तुम्हाला शोधत येईल.


13. मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.


14. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा.


15. खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?”



Rate this content
Log in