होय माझा अंत झालेला अता
होय माझा अंत झालेला अता
1 min
128
मुक्त लिप्ताळ्यातुनी साऱ्याच पाही,
मीच माझा संत झालेला अता
त्यागिता मी सर्व माझ्या वैभवाला,
मज दिसे श्रीमंत झालेला अता
स्वच्छ दृष्टी जाहली; सृष्टीहि सारी,
मोकळा आसमंत झालेला अता
आस नाही; ना तशी ती वासनाही,
जीवनी हेमंत झालेला अता
तो पुराना देह माझा संपला अन्,
मी पुन्हा जिवंत झालेला अता
साहवेना सुख म्हणोनी नेत्र मिटले;
श्वाससुद्धा मंद झालेला अता
मी निघालो दूर, माझ्या मैफलीचा
सूरदेखील संथ झालेला अता